नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह येथे नाशिक जिल्हा अखिल मराठा महासंघ यांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचा सत्कार सोहळा तसेच समाज भुष, नाशिक भुषण तसेच क्रिडारत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, मराठा महासंघाचे संस्थापक, स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला कोरोना काळात मरण पावलेल्या मृताना तसेच देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे होते.
कार्यक्रमास मराठा विदया प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, राष्ट्रीय चिटणीस प्रमोद जाधव, राष्ट्रीय युवक प्रतिनिधी अतिश गायकवाड, उदयोजक शशिकांत जाधव, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गा तांबे, अश्विनी बोरस्ते, कालीका माता मंदीर ट्रस्टी केशव पाटील, मराठा महासंघ डॉक्टर सेलचे अध्यक्ष उमेश मराठे, महाराष्ट्र शासन व सी बी आयचे विशेष सरकारी वकील व अभियोक्ता शिशिर हिरे, जेष्ठ नेते सुनिल बागुल, सुनिता पिंगळे, हंसराज वड़घुले, सचिन पिंगळे, नितीन रोटे पाटील, डॉक्टर धुर्जड आदि प्रमुख उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
मराठा महासंघाच्या कार्यबद्दल उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस अमोल निकम यांनी माहिती दिली .कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यानी केले व सत्कारमुर्ती कोंढरे साहेब यांचा परिचय करुन दिला. राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व शिवाजी जाधव यांचा सत्कार खा.हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. समाज भुषण, नाशिक भुषण व क्रिडा रत्न या पुरस्काराचे वितरण करण्यात आले, महाराष्ट्र शासन व सी बी आय चे विशेष सरकारी वकील व अभियोक्ता शिशिर हिरे यांना मराठा भुषण पुरस्कार, मविप्र सरचिटणीस निलिमा पवार याना मराठा भुषण पुरस्कार, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे याना समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उदयोजक शशिकांत जाधव, बचतगट व महिला सबलीकरण सौ.अश्विनी बोरस्ते, डॉक्टर प्रशांत पवार यांना मराठा भुषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी नाशिक भुषण पुरस्कारही विविध क्षेत्रातील मान्यवराना देण्यात आले. हंसराज वडघुले, नितीन रोटे पाटील, धर्मविर सुनिल बागुल, एडव्होकेट जयंत वाटपाडे, इलेक्ट्रॉनिक मीडिया रिपोर्टर लक्ष्मण घाटोळ यांना नाशिक भूषण पुरस्कार देण्यात आला.
दत्तू भोकनळ अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू, राजेंद्र निंबाळते क्रिडा संघटक , साहेबराव पाटील,गोरख बलकवडे, संजय होळकर, सुनिल मोरे, सतिश धोंडगे, निलेश गुरुळे, द्यानेश्वर निगळ, लहानू जाधव, अजिंक्य दुधारे, तुषार माळौदे, हंसराज पाटील, अस्मिता दुधारे, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, अक्षय देशमुख, पूजा जाधव, सुर्यभांन घोलप, शरयू पाटील, स्वयम पाटील, वेदांत देवरे, रणवीर भोसले, भुमी बनकर, आदिती सोनवणे सर्व खेळाडू व मार्गदर्शक याना त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील बहुमोल कामगिरी बद्दल मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीसतेसाठी अशोक दुधारे सर, चंद्रकांत बनकर, दत्ता पाटील, डॉक्टर उमेश मराठे, योगेश नाटकर पाटील, संजय फडोळ, अस्मिता देशमाने, राजेंद्र शेळके, सागर बागुल, अनिल गायकवाड, सुरेश भामरे, सौ शोभा सोनवणे, अमोल निकम, ज्ञानेश्वर जाधव, विवेक घडुसे, एस पी आहेर, विष्णू अहिरे, प्रसाद औटे, केतन बनकर , योगेश टीळे, सागर कातड, हेमंत मोरे, उदय देशमुख, सचिन इन्गोले, मनोज चव्हाण, अविनाश जाधव, बारकू अण्णा कोशिरे , मंगेश निकम, रावसाहेब निकम, विश्वास वाघ, कमलेश पिंगळे, रोहिणी उखाडे, स्वाती जाधव, अर्चना मगर, वैशाली कोल्हे, राम कोठावळे, विश्वास चुंभळे, कपिल निफाडकर, भास्कर झाल्टे यानी परिश्रम घेतले, सायली सुर्यवंशी, दुर्गा नांदूर्डीकर, व पायल दळवी यानी पारितोषिक वितरण कार्यक्रमात परिश्रम घेतले. सूत्र संचलन मालुंजकर सर व अमोल निकम यानी केले. आभार प्रदर्शन महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता देशमाने यानी मानले.












