Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“झोमॅटो”च्या हॉटेल टू होम खाद्यपदार्थ डिलिव्हरी सेवेचा मनमाडमध्ये प्रारंभ !

Nov 30, 2021

सध्याचे युग हे डिजिटल असुन या युगामध्ये माणसाची संपुर्ण जीवनशैलीच बदलेली आहे. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे स्मार्ट फोन आल्याने ऑनलाईन बाजारपेठेचा ग्राहक वर्ग मोठया प्रमाणात वाढत चालेला असुन समाजातील प्रत्येक व्यापारी हा आपला व्यवसाय ऑनलाईन करण्यावर भर देत आहे.आज जगातील कुठल्याही देशातील नागरिक हा ऑनलाइनच्या माध्यमातून कोणत्याही देशातून सहज खरेदी करू शकत असल्याने ऑनलाइन बाजारपेठेचे स्वरूप हे भव्य झाले आहे.या मध्ये अन्न पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या देखील मागे नसुन यांनी देखील आपल्या व्यवसायची मोठी बाजारपेठ तयार केली आहे.

झोमॅटो आणि स्विगी या दोन मोठ्या कंपन्या या संपुर्ण भारतात अन्नपदार्थ डिलिव्हरीचे काम करतात , झोमॅटो ही कंपनी भारतातील साधारण 525 पेक्षा जास्त शहरे आणि 24 देशांमध्ये या क्षेत्रात कार्यरत असुन , साधारण 10 लाख हॉटेल नव्वद दशलक्ष वापरकर्ते हे झोमॅटो सेवेचा लाभ घेत आहे. दिपेंद्र गोयल आणि पंकज चढा यांनी साधारण 2010 मध्ये झोमॅटो कंपनीची स्थापना केली.मुंबई , पुणे , नाशिक सारख्या मोठया शहरामध्ये झोमॅटो हे काही नवीन नाही , आज या शहरातील अनेक ग्राहक हे अनेक वर्षांपासून या सेवेचा लाभ घेत आहे. भारतात झोमॅटो सारखी कंपनी सुरू होऊन साधारण 11 वर्षे झाली आणि काही वर्षांतच त्यांनी तीची सुरवात ही देशाबाहेर ही केली. कंपनी आपले कार्यक्षेत्र आता छोट्या शहरांमध्ये वाढवत असून, जगातील एवढ्या मोठ्या असणाऱ्या झोमॅटो कंपनीची अन्न पदार्थ डिलिव्हरी सेवा मनमाड शहरामध्ये सुरू होत आहे , ही येथील हॉटेल व्यवसायिक आणि ग्राहकांसाठी देखील खुप चांगली बाब आहे.

मनमाड शहरामध्ये देखील अनेक नावाजलेली असणारी खाद्य पदार्थ दुकाने , हॉटेल आणि आइस्क्रीम पार्लर असुन यांची चव घेण्यासाठी आता नागरिकांना आपल्या घरातुन यांच्या ठिकाणंपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही , झोमॅटोच्या माध्यमातून आता ग्राहक हा शहरातील आपल्या आवडत्या हॉटेलमधून घरबसल्या आपल्या मोबाईल फोन मधुन झोमॅटोद्वारे एका क्लिकवर अन्न पदार्थ घरी मागु शकणार आहे.आपल्या भागात कोणतं चांगलं शाकाहारी, मांसाहारी, अस्सल मराठमोळं किंवा गुजराती थाळी मिळणारं हॉटेल आहे , आज आपल्या परिसरातील हॉटेल मध्ये कोणता चांगला मेन्यू आहे या चौकशांसाठी पूर्वी एखाद्या अस्सल खवय्या मित्राची मदत घेतली जायची. झोमॅटोसुद्धा आपला असाच मित्र आहे.

आज पासुन शहरात झोमॅटो कंपनीच्या कामाला सुरुवात झाली असुन , शहरातील कॅफेवाला रेस्टॉरंटचे संचालक श्री अमोल तावडे यांनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पहिली डिलिव्हरी ऑर्डर देखील दिली.शहरापासुन साधारण 7 ते 8 किलोमीटर पर्यंत झोमॅटोचे कार्यक्षेत्र आहे.शहरातील अनेक हॉटेल व्यवसायिकांचा या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक व्यवसायिक यात सहभागी झाले आहे .येणाऱ्या काही दिवसात आणखी व्यावसायिकांना यात सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे झोमॅटो कंपनीच्या अधिकारी श्री दुसा सिद्धार्थ पंचाक्षरी यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]