loader image

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

Jun 17, 2024


शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी निसंकोचपणे शिक्षण घेऊ शकतो.म्हणून शाळेला मदत करताना मी केव्हाही हात आखडता घेत नाही. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव व जळगाव बुद्रुक येथील नूतन इमारतीचा उदघाट्न सोहळा आमदार सुहास कांदे यांचे हस्ते आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिक्षण हे खरोखरच वाघिणीचे दूध आहे. ते पिल्यानंतर माणूस जसा गुरगूर करायला लागतो तसा तो समाजाच्या हक्कासाठी ही भांडायला लागतो. मी वेहळगाव च्या शाळेला दहा ते बारा संगणक दिलेत. तर जळगाव बुद्रुकच्या शाळेच्या इमारतीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या शाळेने मागणी केल्यास त्यांनाही दहा ते बारा संगणक घेऊन देईन. या ठिकाणी ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेज ची मागणी आहे. तरी मी शिक्षण मंत्री यांच्याकडून ही मागणी पूर्ण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. आज उदघाट्न झालेल्या या शाळेच्या आवारात पूर्ण पेव्हर ब्लॉक व शाळेला संपूर्ण संरक्षक भिंत जिल्हा नियोजन च्या निधीतून बांधून देईन असे ही आमदार कांदे शेवटी म्हणाले.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष अँड. पी. आर. गिते,सहचिटणीस अँड. तानाजी जायभावे, विश्वस्त दिगंबर गिते, दामोधर मानकर, सुभाष कराड, बाळासाहेब वाघ, विलास आव्हाड, सुरेश घुगे, सुधाकर कराड, अशोक भाबड, उत्तम बोडके, श्याम बोडके, तुळशीदास विंचू, अँड. जयंत सानप,जगन्नाथ धात्रक, विष्णू नागरे, विठोबा फड, अशोक नागरे, रामनाथ बोडके,दौलत बोडके, भगवंत चकोर, विजय सानप, विजय बुरकूल, निलेश इप्पर, मोहन चकोर, राजेंद्र सांगळे, प्रमोद भाबड, अंकुश कातकडे,किशोर लहाने, आदीसह वेहेळगाव व जळगाव बुद्रुक मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.