loader image
[ays_poll id=7]

१५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन ४ व ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये !

Nov 30, 2021


संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे शनिवार दिनांक ०४ व रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या के.टी.एच.एम.महाविद्यालाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे फेब्रुवारी २००४ मध्ये सहावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन झाले आहे. 

या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी कवी राजू लहिरे व अमोल खरे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तालुक्यातील कवी देखील आपला सहभाग नोंदविणार आहेत. या कवींमध्ये राजू लहिरे, महेंद्र पगारे, अमोल खरे, लक्ष्मण बारहाते, शांताराम वाघ, भाऊसाहेब दोंड, दिपक सोनवणे आदि कवी सहभागी होत आहेत.
तसेच नांदगाव तालुकातुन यशवंत बागुल( विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य), अॅड.विद्या कसबे (नांदगाव), अमिन नबाब शेख (पत्रकार), डॉ.प्रा.जालिंदर इंगळे (साहित्यिक), सतिश केदारे (कामगार नेते), प्रविण बागुल (कामगार नेते), प्रा.ए.टी.कसबे (नांदगाव), डॉ.नितीन जाधव (साहित्यिक), राहुल संसारे (कवी), अर्जुन बागुल( मनमाड), शरद झोबाड (कामगार नेते) आदी उपस्थित राहणार आहेत.

मनमाड शहरात पत्रकार अमिन नवाब शेख व नांदगाव शहरात अॅड.विद्या कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान सन्मानार्थ १५वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नाशिकचा प्रचार व निधी संकलनाचे कार्य सुरु आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.