loader image
[ays_poll id=7]

पक्ष निरीक्षकांचा अंतिम अहवाल आल्याशिवाय उमेदवारी नाही : लोंढे

Dec 2, 2021


2022 साली होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष तर्फे निवडणूक लढवनाऱ्या उमेदवारांना पक्ष निरीक्षक शंकरराव काकळीज यांचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्याशिवाय उमेदवारी घोषित करण्यात येणार नसल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील येणाऱ्या सर्वच निवडणूकींना सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने सामूहिक प्रयत्न करावेत तसेच योग्य उमेदवार पक्षानिरीक्षक यांना सुचवावेत. उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी भरपूर व प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन लोंढे यांनी केले.
आगामी सर्वच निवडणूकीच्या तयारीसाठी प्रत्येक तालुक्यात मेळावे, सभा व बैठकांचे नियोजन करण्यात येणार असून त्यासाठी रिपब्लिकन पक्ष समविचारी पक्षांशी विचार विनिमय व चर्चा करीत असुन लवकरच अंतिम भूमिका स्पष्ट होईल.
आगामी नगरपंचायत, नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा व नांदगाव या तालुक्यासाठी पक्षनिरिक्षक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते शंकरराव काकळीज यांची नियुक्ती केली असून नांदगाव शहर व ग्रामीण पक्ष निरीक्षक म्हणून त्याच्या मदतीसाठी कपिल तेलुरे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, असेही प्रकाश लोंढे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक काळात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळावी, पक्ष बदनाम होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपले आचरण ठेवावे. पक्षाला व पक्षशिस्तीला गालबोट लागेल, असा कोणताही प्रयत्न कुणी करू नये. पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांनी दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.