Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महापरीनिर्वाण दिनी सर्वांना अभिवादन करता येणार आहे – महापौर किशोरी पेडणेकर !

Dec 2, 2021

येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत येतात. पण, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजन करण्यात येणार आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी देखील कोरोनाचं संकट होतं. त्यामुळे मोजक्या लोकांना चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संधी दिली होती. यंदा सर्वांना बाबासाहेबांना अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी चैत्यभूमीच्या बाहेर रांगा लागतील. लाखो अनुयायी मुंबईमध्ये येतील. त्यांचं उन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी निवारे तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांना खायला सुद्धा देण्यात येणार आहे. मात्र, ओमिक्रॉनचा धोका पाहता सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईत असणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांना ऑनलाइन अभिवादन करावं. कारण, त्यांना कधीही चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेता येतं. बाहेरून आलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौर, उपमहापौरांनी अभिवादन केल्यानंतर सर्वांना अभिवादन करण्याची संधी दिली जाईल, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

अजून बातम्या वाचा..

म.सा. शिवजयंती उत्सव समिती तर्फे HAK हायस्कुल व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल येथे निबंधस्पर्धेचे  पारितोषिक वितरण संपन्न

म.सा. शिवजयंती उत्सव समिती तर्फे HAK हायस्कुल व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध...

read more
मा.आ.संजय पवार व दीपक गोगड यांची शिष्टाई: वंजारवाडी वि. का.सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

मा.आ.संजय पवार व दीपक गोगड यांची शिष्टाई: वंजारवाडी वि. का.सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

वंजारवाडी ता.नांदगाव येथील वंजारवाडी विविध कार्य.से. पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या पंचवार्षिक...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये मराठी राजभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ५६ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये मराठी राजभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ५६ व्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

कोरोना च्या मोठया संकट काळातही वाचन चळवळ जोपासणाऱ्या व मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]