Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

देवीदास चौधरी यांच्या कवितेने अवघड सोपं केलंय..!

Dec 3, 2021

– भास्कर कदम, नांदगाव

‘सोप्पंय सगळं‘ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास हजेरी लावली, तेव्हा बाहेर अवकाळी पाऊस बरसत होता. निसर्गाचं वातावरण व पर्यावरण तर सगळंच बिघडलेलं होतं. अशाही वातावरणात सगळं काही सोपं आणेि सहज सुंदर केलं ते कालिदास कला मंदिरातील बहारदार कार्यक्रमाने. शब्दांत किती ताकद असते, याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. हेमंत टकले, विश्वास ठाकूर असे राजकारणी कम साहित्यिक आणि अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, सुनंदा भोसेकर, हेमंत दिवटे, एकनाथ पगार, दा. गो. काळे, सरबाजीत गरचा, स्वतः देविदास चौधरी अशी नामांकित कवी, समीक्षक, साहित्यिक मंडळीने विचार मंच सजलेला होता. सभागृह श्रोत्यांनी बहरलेले होते. यातही नामांकित तशीच जाणकार, दिग्गज मंडळीसह आप्तस्वकीय मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणजेच आतील वातावरण सहज, सुंदर, संवादी होतं. प्रारंभी प्रकाशक सरबजीत गरचा यांनी ‘सोप्पंय सगळंची प्रसवकळा आपल्या प्रास्ताविकात मांडली. मूळ पंजाबी भाषिक असलेला सरबजीत मराठीच्या त्यातही कवितेच्या प्रेमात पडतो, ही बाब खासच होती.

‘कॉपर कॉईन ही दिल्लीस्थित त्यांची प्रकाशन संस्था. या संस्थेने मराठी कवितेच्या प्रेमात पडावं, म्हणजे भाषेला प्रांताचं बंधन अडसर ठरु शकत नाही, हे अधोरेखित झाले. यासाठी सरबजीत यांना धन्यवाद द्यावेत तेव्हढे थोडेच. कवितेच्या दर्जाला साजेशी मांडणी व बांधणी खूपच दर्जेदार पुस्तक हाती घेताच त्यात डोकावण्याचा मोह होतो. डोकावलं की वाचण्याचा मोह होतो आणि वाचून अंतर्मुख होतो. कमीतकमी शब्दात अवकाश व्यापणारा आशय ही बाब मुळात अवघड. ती किमया साधलीय देविदास चौधरी यांच्या वास्तववादी कवितांनी. जेदिसलं ते मांडलं. शब्द बंबाल काहीही नाही, मोजक्या शब्दात मोठा आशय ही किमया त्यांनी साधली आहे. त्यांच्या कवितांचे अनेक भाषांतर होऊ शकते. अशी बहुभाषिकता त्यातील आशयाला लाभली आहे. याच संग्रहातील एका कवितेत ते म्हणतात, ‘आयुष्यभर वाचतो एकच एक पुस्तक करतो त्यावर चिंतन, प्रवचन, मनन मग ढीगभर पुस्तकं कशाला?‘ या संग्रहात एकूण 75 कविता आहेत. भवताल, सनकाल, कविता बिविता, लिहिता लिहिता, अशुभ वर्तमान, तहहयात या 7 कप्प्यात त्यांचा समावेश आहे. यातील कविता वाचता वाचता वाचक अंतर्मुख होतो. तो त्या वातावरणात कळत न कळत समरस होतो. या कवितांची समीक्षा करण्याची पात्रता माझी नाहीय. पण शब्दांवर प्रेम आहे त्यातील मर्म माझ्या अंतर्मनाला स्पर्श करते.जे पाहिले, वाचले, भावले ते इतरांना सांगितले पाहिजे, ही माझी धारणा आहे, स्वभाव आहे. उपस्थित जाणकार पाहुण्यांनी देविदास चौधरी यांच्या कवितेचे नर्म आपल्या भाषणातून उलगडवून दाखविले. हा संस्मरणीय समारंभ कायम माझं स्मरणात राहील. कारण त्यातील भव्यता नाही तर भावगर्भतः विशेष भावली.

अशोक नायगावकर यांनी आपलं मनमाडचं नातं सांगितलं. मी नांदगावचा म्हणजे आमच्या तालुक्यात त्यांचे वास्तव्य होते याचा अभिमान वाटला. मनमाडचा ऋणानुबंध आजही त्यांच्या मनात कायम आहे हे विशेष भावले. मनमाडी भाषेची लय आपल्या कवितेत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. मातीशी नाळ कायम असणे याला म्हणतात. अरुण म्हात्रे यांचीही नाळ मनमाडशी जोडलेली आहे. एकनाथ पगार हेही मनमाडचे हे माझे दृष्टीने अभिमानाचे होय. मनमाड हे फक्त दक्षिणेचे प्रवेशद्वार नसून तेथे कामगार आणि साहित्यिक एकत्र नांदतात, त्यांची भूमिका परस्पर पूरक असते, ही बाब विशेष आहे. येथे प्राचार्य म. सु. पाटलांचा आवर्जून उल्लेख झाला. साहित्य चळवळ बहरली ती त्यांच्यामुळेच असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याच मुशीत आणि मातीत देविदास चौधरी यांची जडणघडण झालीय, हे महत्वाचे होय. ते आमचेच नव्हेतर अनेकांचे मित्र आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. हेमंतजी टकले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खऱ्याअर्थाने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली, असे गौरवोदार काढले ही देविदास चौधरी यांच्या कवितेला मिळालेली खरी दाद होती. देविदास चौधरी हे मैत्रीला जागणारे दिलदार मित्र आहे, त्यांनी त्यांच्या पुस्तकाची भेट आवर्जून दिली. त्यावरील सही मी मनात जपून ठेवली आहे. मी काही पुस्तके विकत घेऊन काही वाचनालयास भेट देणार आहे. आपणही याचे अनुकरण करावे, ही अपेक्षा !

दिलदार देवदास या मित्रास भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! 

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]