Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात कर्तव्यदक्ष व निर्भिड पोलीस निरीक्षकाची नेमणुक करावी : रिपाईची मागणी !

Dec 4, 2021

मनमाड शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरात कायमस्वरुपी कर्तव्यदक्ष. निर्भिड पोलीस निरीक्षकाची नेमणुक करण्यात यावी, या आशयाचे निवेदन रिपाई युवा नांदगाव तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. 

मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. शहराची लोकसंख्या सुमारे दिड लाखाच्या आसपास आहे. संपूर्ण देशभरातून रेल्वेच्या माध्यमातून हजारो नागरीक ये-जा करतात. शहरात गुन्हेगारी कारवायात वाढ झाली असून कायद्याचा गुन्हेगारांना कुठलाही धाक राहिला नसल्याचे वातावरण आहे, त्यामुळे शहरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत, सराईत गुन्हेगाऱ्यांच्या गुन्हेगारीत वाढ झाल्यामुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यातच आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील टोळी युध्दात देखील वाढ झाली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे, मात्र गुन्हेगारांवर कारवाई का होत नाही? गुन्हेगारांवर वरदहस्त कोणाचा आहे? की ज्यामुळे गुन्हेगार मोकाट फिरुन गुन्हेगारी कारवाया करीत आहेत, हा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी शहरात मोटारसायकल चोरांनी धुमाकूळ घातला होता, मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद केली असता 14 मोटारसायकल हस्तगत होऊन सुध्दा आरोपींना एका दिवसात जामीन मिळतो कसा? मागील महिन्यात शहरातील प्रतिष्ठीत वकील यांच्यावर सराईत गुन्हेगाराच्या टोळक्याने प्राण घातक हल्ला करुन धारदार शस्त्राने वार केले. तरी सुध्दा सराईत गुन्हेगारांना एका दिवसात जामिन मिळतो? त्यातच काल मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यावर सराईत गुन्हेगाराकडून प्राणघातक हल्ला झाला, यामुळे मनमाड शहरातील पोलीस, वकिल यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात मग सर्व सामान्य नागरीकांना पोलीस कसे संरक्षण देणार? कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असून पोलीसांचा वचकच शहरावर राहिलेला नसल्याची भावना सामान्य नागरिकांत आहे. तरी या गुन्हेगारी पार्श्वभुमीची चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी व मनमाड शहराला कायमस्वरुपी कर्तव्यदक्ष. निर्भिड पोलीस निरीक्षकाची नेमणुक करावी, असे या निवेदनात नमूद केलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]