मनमाड : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील गरजवंत , गरजु नागरीक आणि रुग्णांच्या सेवेचे काम हे रोनक फौंडेशनच्या माध्यमातून फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ.वर्षा झाल्टे , सचिव श्री संतोष वाबळे आणि सदस्य करीत आहे.
गेल्या कोरोना काळापासून शहरातील अनेक गरजवंत रुग्णांची सेवा ही रोनक फौंडेशन करत आहे. फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ. वर्षा झाल्टे या अनेक रुग्णांना सेवाभाव वृत्तीने सेवा देत असुन , कोरोना परिस्थिती मध्ये त्यांनी अनेक गरजवंत रुग्णांना कुठलेही शुल्क न घेता त्यांच्यावर उपचार केले आहे , वेळोवेळी निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे आणि आज देखील ते हे सर्व कार्य करत आहे. फौंडेशनचे सचिव श्री संतोष वाबळे हे देखील सेवाभाव वृत्तीने आपले काम करत असुन गरजु असणाऱ्या नागरिकांना , जेष्ठ नागरिकांना आपल्या रिक्षातुन निःशुल्क सेवा देत असतात , कोरोना परिस्थितीमध्ये तर सर्व नागरिक घरी असताना , इच्छा असून देखील अनेक जवळचे मित्र , नातेवाईक मदत करू शकत नसताना श्री संतोष वाबळे यांनी प्रशासनाची विशेष परवानगी घेऊन आपल्या रिक्षातून रुग्णांची निःशुकच सेवा केली होती.रोनक फौंडेशनच्या सदस्यांचा वतीने कोरोना परिस्थितीमध्ये समाजातील गरजवंत कुटुंब आणि नागरिक यांच्यासाठी महान असे अन्नसेवेचे कार्य देखील करण्यात आले असुन, या कामासाठी डॉ.सौ.वर्षा झाल्टे , श्री संतोष वाबळे आणि रोनक फौंडेशनच्या सर्व सदस्यांचे आदरणीय खासदार , आमदार , पोलीस अधिकारी , मुख्याधिकारी , नगराध्यक्ष आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना कामासाठी शुभेच्छा दिलेल्या आहे.
रोनक फौंडेशनचा वेगळेपणा म्हणजे या फौंडेशनच्या सर्वात जास्त सदस्य या महिला असुन फौंडेशनच्या सर्व उपक्रमात त्या नेहेमी सक्रिय सहभागी असतात. रोनक फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ.वर्षा झाल्टे आणि सचिव श्री संतोष वाबळे यांनी सांगितले की , या पुढे रोनक फौंडेशनच्या माध्यमातून शहरातील अनेक गरजवंत महिलांसाठी फौंडेशन काम करणार असुन मुख्य करून महिलांना शहरामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल जेणे करून महिलांचा देखील आपल्या कुटुंबासाठी हातभार लागेल या उद्देशाने पुढील दिशेने रोनक फौंडेशनच्या कामाची वाटचाल असणार आहे.
रोनक फौंडेशनच्या जनसेवेच्या कामाला नेहेमी यश मिळत राहो , समाजातील गरजवंतांना फौंडेशनच्या या सेवाकार्याचा लाभ होऊन त्यांची दुःख कमी होवो , फौंडेशनला नेहेमी समाजाच्या चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळत राहो , अशा शुभेच्छा.












