भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १८ तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने येथील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.राजरत्न वाहुळ,विकास शिंगाड़े,तौसीफ अंसारी,जीवन दौन्डे आदी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.वाचनालय व अभ्यासिकेचे अध्यक्ष सुरेश खळे,अभिमन्यू शिरसाठ,बाळा खळे,वसतिगृह व्यवस्थापक खैरनार सर आदी या वेळी उपस्थित होते.
सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...










