राज्याचे कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी शिवसेना चांदवड तालुका संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शिवसेनेच्या कार्याचे कौतुक केले. शिवसेना संपर्क कार्यालयातून जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन मंत्री महोदयांनी उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मा.तहसिलदार पाटील यांना शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संदिप उगले, शिवसेना उप-शहरप्रमुख सचिन खैरनार, शिवसेना संघटक प्रसाद प्रजापत, सुनिल बागुल, शांताराम भापकर, जेष्ठ शिवसैनिक विष्णु कोतवाल, विकी गवळी, धनु पाटील आदींसह सरपंच व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.













