Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने मनमाड ट्रेकर्स तर्फे अंकाई किल्ल्यावर पर्वत पूजन व पर्वत रक्षणाची प्रतिज्ञा

Dec 11, 2021

जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने मनमाड ट्रेकर्स तर्फे अंकाई किल्ल्यावर पर्वत पूजन व पर्वत रक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली
मनमाड मधील गिरिप्रेमी निसर्गप्रेमींनी आज अंकाई किल्ल्यावर महंत माऊली बाबा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पर्वत पूजन करण्यात आले व उपस्थित सर्वांनी पर्वत व निसर्ग रक्षणाची प्रतिज्ञा पूर्वक शपथ घेतली उपस्थित सर्वांनी नैसर्गिक ठेवा जतन करण्याची ग्वाही दिली नंदकिशोर पगार सर यांनी बहारदार पोवाडा सादर करून पर्वत दिनाचे महत्त्व कथन केले कवी शांताराम वाघ यांनी छानशी चारोळी सादर करीत पर्वत दीन कार्यक्रमाची रंगत वाढविली

गड किल्यावर जाऊन
संस्कृती करू जतन,
पाषाणातल्या देवाचे
पवित्र पर्वत पूजन ,
इतिहासाचे साक्षीदार
जाणून घेऊ त्यांना जवळून
निसर्गाच्या सानिध्यात
करू या पर्वत गमन
आज करू त्यांना नमन!

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष योगेश पाटील छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे तुषार गोयल डॉक्टर भागवत दराडे प्रवीण मोरे सर गणेश वहाले नंदकिशोर पगार सर स्वराज करकाळे गणेश आहेर कवि शांताराम वाघ किरण भाबड मोहित मकवान प्रतिक दराडे नरेंद्र खैरे मधुरा देसले डॉक्टर भाऊराव देवरे महेंद्र भाऊ बोरसे भिला व्हडगर रवी छाजेड यश पगार वेदांत आहेर शिवम भाबड उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव विधी व न्याय सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड. सुधाकर मोरे यांची नियुक्ती

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव विधी व न्याय सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड. सुधाकर मोरे यांची नियुक्ती

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार ,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे,...

read more
दत्त पुलाचे लोकार्पण संपन्न मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द – आमदार कांदे

दत्त पुलाचे लोकार्पण संपन्न मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द – आमदार कांदे

मनमाड शहरातील श्री दत्त पुलाचे लोकार्पण आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात...

read more
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]