Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संदीप देशपांडे सरांच्या “मन्याने” साहित्य संमेलनात उडविली धमाल

Dec 12, 2021

मनमाड नाशिक येथे नुकत्याच झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येथील शिक्षक ,साहित्यिक पत्रकार संदीप देशपांडे याना महाराष्ट्र्र साहित्य महामंडळ पुणे व लोकहितवादी मंडळ नाशिक यांच्या वतीने विशेष निमंत्रित करण्यात आले . साहित्य संमेलनात दोन दिवस चाललेल्या व लहान मोठ्या रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या ऐतिहासिक बालकुमार साहित्य मेळाव्यात महाराष्ट्रातील निमंत्रित बाल साहित्यिकांच्या अभिवाचन कार्यक्रमात संदीप देशपांडे यांचे कथाकथन ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या साहित्य संमेलनात संदीप देशपांडे सरांचा खोडकर मन्या संमेलनात अवतरला आणि या मन्याने एकच धमाल उडवून दिली.विविध करामती करता करता आजोबांची आठवण व कोरोनाने आजोबांना दूर नेल्याने मन्याच्या भावनिक स्थितीचे यथार्थ दर्शन उत्कृष्ट सादरीकरणातून घडवले, हसवता हसवता मन्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले .या निमंत्रीतात ज्येष्ठ साहित्यिक पृथ्वीराज तौर, समीक्षक विनोद सिनकर, पत्रकार व लेखक प्रशांत गौतम, संजय वाघ, समीक्षक विद्या सुर्वे, संतोष हुदलीकर कवयित्री अनुराधा राजाध्यक्ष, किरण भावसार यांचा समावेश होता.

साहित्यिकांशी गप्पा
दरम्यान साहित्य संमेलनात बाल साहित्यिकांशी मुलांशी गप्पा हा कार्यक्रम खूप रंगला . या कार्यक्रमास संदीप देशपांडे निमंत्रित होते, साहित्य निर्मिती बाबत मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देताना साहित्यिकांची कसोटीच होती.
श्री देशपांडे याना बालकुमार मेळाव्याच्या निवड समितीत देखील घेण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कविवर्य खलील मोमीन यांनाही कवितेसाठी विशेष निमंत्रित करण्यात आले तर कवी प्रदीप गुजराथी यांची कविता कवी कट्ट्यासाठी निवडण्यात आली . त्यांनी काव्य वाचन केले.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]