loader image
[ays_poll id=7]

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का : रोहित शर्माला दुखापत !

Dec 13, 2021


26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्या अगोदरच भारताचा उपकर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा याला दुखापत झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि एकदविसीय मालिका खेळणार आहे. भारतीय संघ 16 डिसेंबरला आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा हुकमाच्या एक्क्याला दुखापत झाली आहे. 

रोहित शर्मा मुंबईत सराव करत होता. या सरावादरम्यान त्याला ही दुखापत झाली.  रोहितला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे की नाही, याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही. ही दुखापत फार गंभीर स्वरुपाची नसावी, अशीच प्रार्थना ही रोहितच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे.   

रोहितत्या दुखापतीबाबत अजून काही स्पष्ट नाही. मात्र ही दुखापत गंभीर असेल, तरीही रोहितकडे दुखापतीतून सावरण्यासाठी 2 आठवड्यांचा पुरेसा वेळ आहे. मात्र यानंतरही तो सावरला नाही, तर त्याला पहिल्या कसोटीला मुकावं लागू शकतं.  रोहितच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटची चिंताही काहीशा प्रमाणात वाढली आहे. रोहितचं दुखापतीतून सावरणं हे टीमसाठी महत्त्वाचं आहे. कारण रोहित कसोटी क्रिकेटमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा जो रुटनंतर दुसराच फलंदाज आहे. 


अजून बातम्या वाचा..

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-16 नाशिक जिल्हा संघाच्या निवड चाचणी...

read more
.