मनमाड- क्रिडा व युवक संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित आंतरशालेय नांदगाव तालुका स्तरावर सेंट झेवियर्स हायस्कूल मनमाड येथे झालेल्या १९ वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड संघाने उत्कृष्ट कामगिरी करून स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला.व जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी संघाची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी, सचिव हज्जन सायरा सलीम गाजीयानी,सदस्या आयशा सलीम गाजीयानी, मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरिफ कासम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळेचे शेख आरिफ सर, कमलेश पाटील सर व सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक शेख मंजूर अहमद यांचे मार्गदर्शन लाभले.