loader image
[ays_poll id=7]

दत्ताचे शिंगवे येथील दत्त जयंती यात्रा उत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द !

Dec 14, 2021

सालाबादाप्रमाणे चांदवड तालूक्यातील शिंगवे येथे साजरा होणारा दत्त जयंती यात्रा उत्सव सलग दुसऱ्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रति गाणगापूर म्हणून ख्याती असलेले चांदवड तालुक्यातील दत्त मंदिर येथे दरवर्षी दत्त जयंती यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्यामुळे गेल्या वर्षी देखील यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. यंदाही ओमायक्रोन विषाणूचा प्रसार थांबविण्याच्या सावधगिरीमुळे मा.जिल्हाधिकारी यांनी यात्रा उत्सव रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भाविक दर्शनापासून वंचित राहू नयेत  म्हणून कोरोनाच्या सर्व प्रतीमबंधात्मक नियमांचे पालन करून दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे.

शनिवार दि.१८ डिसेंबर रोजी दत्त जयंती व रविवार दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा.श्री दत्त पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनास येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे, सॅॅनिटायझरचा वापर करणे, दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात न थांबणे व गर्दी न करणे, या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. 

यात्रा काळात मंदिर परिसरात मिठाई, प्रसाद, पूजा साहित्य, खेळणी, पाळणे इत्यादी दुकाने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर करवाई करण्यात येईल, अशा सूचना देखील पोलीस निरीक्षक, चांदवड, सरपंच , ग्रामपंचायत मेसनखेडे खुर्द, पोलीस पाटील मेसनखेडे खुर्द व श्री दत्तमंदिर ट्रस्ट मेसनखेडे खुर्द यांनी दिल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.