Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कऱ्ही येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांना स्मृतिदिनी अभिवादन व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण !

Dec 14, 2021

नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील व्ही.एन.नाईक माध्यमिक विद्यालयात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांना स्मृतिदिनी अभिवादन करून विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वाल्मिक सानप होते. दत्तूपंत घुगे, शंकर राख, सुभाष घुगे, वाल्मिक घुगे, बाळू दराडे, वाल्मिक सगळे, साईनाथ दराडे, दशरथ लहिरे आदींच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक बी.एस.नागरे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा.राजू लहिरे यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचे जीवनकार्य व देशासाठीचा त्याग आपल्या भाषणातून विद्यार्थी व ग्रामस्थांसमोर मांडला तसेच यावेळी विद्यालयात क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक व लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमिताने कब्बडी, खो-खो, क्रिकेट, वक्तृत्व, लिंबू चमचा, संगीतखुर्ची आदी सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.टी.मोरे यांनी तर आभार प्रदर्शन ए.व्ही.सानप यांनी केले.


कार्यक्रमास के.व्ही.सानप, डी. आर.सोनावणे, लक्ष्मण काकड, विष्णू डोमडे, छगन घुगे, रमेश लहिरे, अनिल डोंगरे, आप्पा राख, जनार्दन लहिरे, देवराम ढाकणे, भावराव घूगे, अनिल सोनावणे, चिंतामण डोमाडे, नवनाथ वाघ, पंडित डोमाडे, संतोष लहिरे, संदिप कांगणे, शिक्षकवृंद ,विद्यार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]