Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडला पत्रकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

Dec 15, 2021

प्रतिनिधी (प्रतिनिधी) : जानेवारी पत्रकार दिनानिमित्त प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका समन्वयक अमोल खरे यांनी येथे केले

मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित नाशिक ग्रामीण पत्रकार संघाच्या नांदगाव तालुका पत्रकार संघाची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, तर मंचावर जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके उपस्थित होते पत्रकार अमोल खरे पूढे म्हणाले की नांदगाव तालुक्यात नाशिक ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे सर्वांनी एकजूट राहून कार्य करावे यावेळी
राष्ट्रीय कीर्तीचे जेष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचे निधन झाले तसेच आपल्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांचे ११ साथीदार यांचे निधन झाल्याने जेष्ठ पत्रकार सतिष शेकदार यांनी शोकप्रस्ताव सादर केला पत्रकार अशोक बिदरी यांनी आलेल्या पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत करावे कोरोना सारख्या महामारीत कोणीही घराबाहेर नव्हते आशा काळात आपल्या स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी न करता ज्यांनी केवळ आपल्या कामावर निष्ठा ठेवून कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहरात काम केले असे झी २४ तासचे पत्रकार निलेश वाघ, एबीपी माझाचे पत्रकार अजय सोनवणे, लोकशाहीचे पत्रकार संदीप जेजुरकर यांना कोरोना योद्धा म्हणून राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा तर
नव्याने पदार्पण करणाऱ्या साप्ताहिक ठिणगी ची सुरवात केल्याबद्दल संपादक तुषार गोयल यांचा तर  मराठा सेवा महासंघाच्या नांदगाव तालुका कार्याध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके यांची नियुक्ती तर नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या संदीप देशपांडे आणि संस्कृती संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी योगेश म्हस्के यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बैठकीचे अध्यक्ष नरेश गुजराथी यांनी कार्यशाळेच्या नियोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थितीत सर्वांनीच आपले वेगवेगळे मते व्यक्त करत कार्यशाळा यशस्वी करण्यासंदर्भात मनोदय व्यक्त केला यावेळी नांदगाव तालुका समन्वयक तसेच अमोल खरे,  जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, सतिष शेकदार, सुरेश शेळके, निलेश वाघ,  संजय मोरे, सोमनाथ घोंगाने, संदीप जेजुरकर, अशोक बिदरी, तुषार गोयल, अनिल आव्हाड, अजय सोनवणे,  समसन आव्हाड, प्रीतम आहेर, नरहरी उंबरे, संदीप देशपांडे, नाना आहिरे, सुरेश नारायने, बापू जाधव, सचिन गायकवाड, बाबासाहेब काळे, रामदास सोनवणे, उपाली परदेशी, मारुती जगधने, शशिकांत पाटील, धंनजय देशमुख, आंनद बोथरा, अफरोज शेख, योगेश म्हस्के,  निलेश व्यवहारे, रोहित शेळके, निखिल मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]