loader image
[ays_poll id=7]

‘या’ कालावधीत सप्तश्रुंगी गड रस्ता बंद राहणार

Sep 28, 2026

सप्तशृंगीगड ता. कळवण येथील सप्तशृंगीगड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानूर – अलियाबाद रामा-२१ कि.मी. ०/०० ते १०/०० मध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम आहे. काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर असून सदर कामाअंतर्गत मौजे सप्तशृंगीगड ते नांदुरी घाट मार्गातील रस्त्याचे काम सा.बा. उपविभाग क्रमांक ४ कळवण अंतर्गत सुरू आहे.

त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, सा.बा. उपविभाग क्रमांक ४ कळवण, कॅम्प नाशिक यांचे कडील पत्रान्वये सप्तशृंग गड ते नांदुरी रस्त्यावरील घाटमार्गामध्ये काँक्रिटीकरणाचे काम करत असताना वाहतूक वळविणेसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. वरील रस्त्यावर वाहतूक सुरू असल्यास काम पूर्ण क्षमतेने तसेच विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही. तसेच आगामी कुंभमेळा २०२७ मध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटमार्गामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सुरू असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ नुसार मला असलेल्या अधिकारानुसार नांदुरी ते सप्तशृंगीगड हा रस्ता दि. २९/०९/२०२६, दि. ३०/०९/२०२६ व दि. ०१/१०/२०२६ या वेळेत बंद करण्यात येत आहे.

तसेच पायी जाणाऱ्या भाविकांसाठी नांदुरी ते सप्तशृंगीगड हा पायी मार्ग नियमित सुरू असून मंदिर हे नियमित खुले राहील. तसेच अत्यावश्यक सेवा, ॲम्ब्युलन्स, स्कूल बस यांना सूट देण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
.