गेल्या अनेक दिवसापासून राज्यात एस.टी.कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी आर्थिक अडचणीला सामोरे जात असताना या कामगारांना पाठिंबा देत मनमाड बस डेपो येथील ७० ते ८० हुन अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा विचार करत व सामाजिक बांधिलकी जपत त्यांना एक हात मदतीचा म्हणून चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूल आहेर त्यांच्या माध्यमातून मनमाड आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आपल्या हक्काच्या मागणीसाठी लढा देत आलेल्या एसटी कर्मचारी बांधवांसोबत आम्ही सदैव आहोत आणि त्यांना आमची गरज असेल त्यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी ग्वाही देखील आमदार आहेर यांच्या प्रतिनिधींनी दिली.
यावेळी भाजप चांदवड तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, गणेश महाले, डॉ.भाऊराव देवरे, डॉ.सुनील सोनवणे, योगेश ढोमसे, पंढरीनाथ खताळ, किरण बोरसे, आत्माराम खताळ, सागर अहिरे, डॉ.सागर कोल्हे, दिलीप गांगुर्डे, सुरेश पिठे, शरद गांगुर्डे, राहुल पवार आदि उपस्थित होते.












