loader image
[ays_poll id=7]

नगर पंचायत निवडणूक : मविआच्या ३ मंत्र्यांनी ठोकला तळ!

Dec 19, 2021


२१ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी मविआच्या 3 मंत्र्यांनी जिल्ह्यात तळ ठोकला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. ओबीसी राखीव असणाऱ्या 11 जागांसाठी आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक होत असुन या जागांवर १८ जानेवारीला मतदान व संपूर्ण मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.

जिल्ह्यातील नगरपंचायतींची निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी तीन मंत्री रिंगणात उतरले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सुरगाणा येथे तळ ठोकून आहेत. कृषिमंत्री दादा भुसे हे पुढील तीन दिवस सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुका पिंजून काढणार आहेत. या भागात त्यांच्या रॅली आणि सभा होणार आहेत. सोबतच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळही जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.