Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुपतसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेला उत्साहात साजरा….!

Dec 20, 2021

श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या गुपतसर साहेब गुरुद्वारा मनमाड मध्ये दरवर्षी गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात येत असते.

यंदाच्या वर्षीच्या श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या 355 व्या पावन प्रकाश पूरब निमित्ताने दि.17,18 ,19 डिसेंबर रोजी गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भजन, कीर्तन, लंगर आदी धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. श्री मेहेल सिंगजी आणि श्री बलदेव सिंगजी (वडाळा) यांनी तीन दिवस कथा आणि किर्तन सादर केले. सालाना जोडमेला निमित्ताने गुरुद्वाराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव, मान्यवर आणि कलाकार सहभागी झाले होते.

दर वर्षी गुरुद्वारा पासुन संपुर्ण मनमाड शहरामध्ये सालाना जोडमेला निमित्ताने भव्य स्वरूपात नगर किर्तनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु यंदा प्रशासनाच्या सुचनेप्रमाणे संपुर्ण शहरात नगर किर्तन न काढता गुरुद्वारा परिसरातच नगर किर्तन काढण्यात आले.

याप्रसंगी अनेक शहरातील शीख बांधव आणि शहरातील सर्व धर्मिय नागरिक आणि भाविक या उत्सवात सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]