Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या जनजागृती अभियानास सुरुवात

Dec 20, 2021

ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या वतीने आज मनमाड शहरात विविध नागरी सुविधा बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने विविध मागण्या असलेले फलक आज लावण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.स्वच्छ आणि सुंदर मनमाड, अमरधाम चे सुशोभीकरण, स्वच्छतागृहाची साफ सफाई, मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त,किमान पाच दिवसाआड पाणीपुरवठा करणे, वाघदर्डी धरणातील वाया जाणारे पाणी, दत्त मंदिर ते पकिजा कॉर्नर रस्त्याचे उर्वरित काम त्वरित करावे, वाघदर्डी धरण परिसराचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा ह्या प्रमुख मागण्यांचे फलक यावेळी प्रदर्शित करण्यात आले. या कार्यक्रमाला एस. एम.भाले,नरेंद्र कांबळे,दिलीप आव्हाड,कृष्णाजी पगारे,आर बी. ढेंगळे,गोपीनाथ गायकवाड,गणपत पगारे,रमेश खरे, ए के निकम, सुधाकर गायकवाड,राजू कराटे,साळसकर आदी उपस्थित होते.

 

 

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]