loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे मका ट्रक लोडिंग इलेव्हेटर मशीनचे उद्घाटन !

Dec 22, 2021


आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या मदतीने मानवाने आपली कामे कमी वेळेत व अधिक प्रभावीपणे व्हावीत यासाठी विविध प्रकारची यंत्र सामुग्री तयार केली आहे. अशाच एका अत्याधुनिक मशीनचे काल नांदगाव येथे उद्घाटन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रसिद्ध व्यापारी व नांदगाव शिक्षण मंडळाचे माजी सभापती उमाकांत घोंगाणे, सोमनाथ घोंगाणे, महेंद्र घोंगाणे यांच्या खळ्यावर मका ट्रक लोडिंग इलेव्हेटर या मशीनचे उदघाटन तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते झाले.  या मशीनमुळे आता तीस टन मका ट्रक मध्ये भरण्यासाठी अवघा एका तास लागणार आहे. त्यामुळे वेळ व पैसा या दोन्ही गोष्टींचा फायदा होणार आहे. नांदगाव सारख्या शहरात घोंगाणे परिवाराने सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल आमदार कांदे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या बदलांना सामोरे जावून आपल्यात बदल घडवून आणावेत आणि आपली प्रगती करणे हि काळाची गरज झालेली आहे आणि तेच काम घोंगाणे परिवाराने नांदगाव नगरीत केले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब कवाडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती तेज कवडे, माजी सभापती विलास आहेर, संतोष गुप्ता, राजेंद्र देशमुख व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घोंगाणे परिवारातर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोमनाथ घोंगाणे यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.