loader image
[ays_poll id=7]

नामपुर येथे डॉ.सौ.योगिता अपूर्व हिरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

Dec 23, 2021

नामपुर एस.पी.एच. महाविद्यालय येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विश्वस्त डॉ.सौ.योगिताताई हिरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध स्पर्धाद्वारे साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या महायोग विशाखा समिती अंतर्गत आरोग्य व समतोल आहार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.यु बी कदम होते. कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.ए.एन.अहिरे यांनी आपल्या व्याख्यानातुन संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी आवश्यक जीवनसत्वे, खनिजे, कर्बोदके यांच्या बद्दल सखोल माहिती दिली. आयुर्वेदाचे जीवनातील महत्त्व विषद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.यु.बी.कदम यांनी योगिताताईना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आरोग्य समतोल आहाराविषयी सविस्तर विवेचन केले.

सदर कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.यु.बी.कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  एस.आर. निकम, पर्यवेक्षक ए.डी.पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस. एस. महाले यांनी केले व आभार प्रा.जे. एस. सुर्यवंशी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.