जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर संयोजकांचा गौरव समारंभ व वर्धापन दिन सोहळा प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शतकवीर, अर्धशतकवीर, व नियमित सातत्यपूर्ण रक्तदान शिबीर घेणाऱ्या रक्तदान शिबीर संयोजकांचे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दिप्ती देशपांडे, रा.स्व.संघ जनकल्याण समिती प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर, नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंके, लघु उद्योग भारती नाशिक विभाग कार्यवाह मिलिंद देशपांडे, जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, कार्यवाह शैलेश पंडित यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. मनमाड शहरात राजकारण करतांना सामाजिक बांधिलकी जपत भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी सन 2005 पासून सलग 23 रक्तदान शिबीरांचे आयोजन केले म्हणून मान्यवरांच्या हस्ते नितीन पांडे यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला नितीन पांडे ह्यांनी ओम मित्र मंडळ च्या माध्यमातून 1986 साली रक्तदान चळवळीत कार्य सुरु केले ओम मित्र मंडळ, राष्ट्रीय शीख संगत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून 1986 पासून 2004 पर्यंत आयोजित सर्व रक्तदान शिबिर संयोजना मध्ये नितीन पांडे यांचा मोठा आणि उल्लेखनीय असा सहभाग राहिला आहे 1989 पासून रक्तदान शिबीर संयोजक म्हणून पांडे यांचे जनकल्याण रक्तकेंद्राशी दीर्घ नियमित संपर्क आला तर 14 ऑगस्ट 2005 या अखंड भारत दिना निमित्ताने 2025 पर्यंत मनमाड शहर भाजपा मंडला च्या वतीने सलग 21 शिबीरे प्रति वर्षी एकच ठिकाण एकच तारीख एकच संयोजक एकच रक्तपेढी असा विक्रम पण पांडे यांचा झाला आहे आता पर्यंत नितीन पांडे यांनी संयोजन करून आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 1200 पेक्षा जास्त ऐच्छिक रक्तदात्या नी सहभाग घेतला आहे तर हा मला मिळालेला सन्मान रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा असून रक्तदान शिबीर संयोजन करतांना निःस्वार्थ पणे नियमित मदतीला येणाऱ्या सर्व भाजपा चे पदाधिकारी कार्यकर्ते व ज्ञात अज्ञात हितचिंतक व्यक्ती आणि संस्था यांचा आहे असे नितीन पांडे यांनी यावेळी सांगितले यावेळी जनकल्याण रक्तकेंद्राचे सहकार्यवाह मदन भंदुरे, भाजपा नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, भाजपा नाशिकग्रामीण जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे जनकल्याण समिती चे अनिल चांदवडकर डॉ. रश्मी दिवे, विद्या एकबोटे, सुबोध गर्गे, विद्या एकबोटे, विशाल पाठक, समीर देव, नरेश अहिरे, प्रदीप गुजराथी, डॉ. संगीता लोढा, डॉ. सुजाता सोनवणे, प्रशासकीय अधिकारी विनय शौचे सुरेश पिंगळे अभय बलदोटा तसेच पदाधिकारी कर्मचारी वृंद व शिबीर संयोजक व हिंतचितक उपस्थित होते.

राशी भविष्य : २९ऑगस्ट २०२५ – शुक्रवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....