Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

हर्षाली बाजीराव मिस्कर हिची ग्रापलिंग एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड

Dec 29, 2021

मनमाड(वार्ताहर):- येथील मध्ये रेल्वेच्या इंडियन हायस्कुल मधील हर्षाली बाजीराव मिस्कर हिची फेब्रुवारी महिन्यात मास्को येथे होणाऱ्या ग्रापलिंग एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
२४ ते २६ डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात कोकमठाण येथे झालेल्या १४ व्या नॅशनल ग्रॅपलिंग चॅॉम्पयनशीपमध्ये येथील हर्षाली बाजीराव मिस्कर या मुलीने १४ ते १५ वयोगटात ५४ किलो वजनी गटात ‘नोगी’ या खेळातील प्रकारात एकूण ५ फाईट खेळून घवघवीत यश प्राप्त केले. त्यामध्ये हरीयाणा,उत्तर प्रदेश,बिहार,मध्यप्रदेश आदी राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते.यांच्याशी जिद्दीने खेळून हर्षालीने सुवर्णपदक प्राप्त केले आहे.त्यामुळे यानंतर फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या शिया (मास्को) येथे एशियन चॅॉम्पयनशीप या स्पर्धेसाठी हर्षाली मिस्करची निवड झाली आहे.तिच्या या यशाबद्धल तिचे अभिनंदन केले जात आहे.

अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]