loader image
[ays_poll id=7]

शारदा संगीत कलामंदिर संस्थेचे यश

Dec 29, 2021

नासिक येथील शारदा संगीत कलामंदिर या संगीत व कलेला वाहून घेतलेल्या संस्थेत आज रोजी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या संस्थेतील विद्यार्थिनी लतिका देशपांडे व अंकिता खेलुकर यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली असून या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे संचालक राजेश मारोती शेळके यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.सातपूर व नासिकरोड परिसरात अनेक संगीत प्रेमींना शास्त्रोक्त पद्धतीने हार्मोनियम,तबला वादनाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य गेली अनेक वर्ष शारदा संगीत कलामंदिर करित असून कलेला अविरत पणे जपण्याचे आणि जोपसण्याचे कार्य चालू आहे.परिसरातील अनेक नवोदित कलाकारांना घडविण्याचे काम या संस्थेमार्फत झालेले आहे.अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई या केंद्राशी शारदा कलामंदिर संलग्न असून या मार्फत विविध स्तरावरील सांगितिक परीक्षांचे आयोजन करण्यात येते.या प्रसंगी विविध पालक देखील उपस्तिथ होते. दरवर्षी संस्थेच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने सदर संस्थेतर्फे विविध कलादर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या लोक हितोपयोगी उपक्रमाची सुरवात संस्थेचे संथापक गुरुजी मारोती नारायण शेळके यांनी केली असून त्यांनी आपली कला हुबेहूब आपल्या मुलामध्ये उतरवली आहे.कलेचे हे संस्कार पिढीजात पणे राजेश शेळके व त्यांचे बंधू बासरी वादक भूषण शेळके यांनी जतन केले आहेत.
या प्रसंगी भविष्यातील नियोजन आणि आभार व्यक्त करून सांगता करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.