loader image
[ays_poll id=7]

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती..!!

Jan 3, 2022


आज 3 जानेवारी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती , सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. अठारव्या शतकात अगदी स्त्री शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी पती जोतीराव फुले यांच्या आग्रहाने, सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि इतक्यावर त्या थांबल्या नाहीतर शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.

महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य, त्याग लक्षात घेऊनच क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा जयंती दिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती. याच शाळेत त्यांनी शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी मुलींसाठी तब्बल 18 शाळा सुरु केल्या.
पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी मिळवला.

केवळ शिक्षिका म्हणून नाही तर कवयित्री आणि समाजसुधारक म्हणूनही त्यांची ओळख आहे.
अवघ्या 9 वर्षांच्या असताना सावित्रीबाईंचा ज्योतिबा फुलेंशी विवाह झाला.
स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि इतरही सामाजिक सुधारणांसाठी सावित्रीबाई यांनी खूप प्रयत्न केले.
त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे 1955 पासून सावित्रीबाईंचा जन्मदिवस ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो.
‘काव्यफुले’, ‘बावनकशी’, सुबोध रत्नाकर’ हे त्यांनी लिहिले काव्यसंग्रह.
जोतिरावांनी सुरु केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह सावित्रीबाई यांनी समर्थपणे चालवले. तेथील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपल्या मुलांप्रमाणेच वाढवले. तेथेच जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवा महिलेचे बाळ त्यांनी दत्तक घेतले. त्याला ‘यशवंत’ असे नाव ठेवले.
जोतिबांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सावित्रीबाईंचे ‘स्त्रियांनी शिकावे’ हेच ब्रीदवाक्य होते. 1897 साली आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम केले. अखेर प्लेगची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.