Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Jan 3, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती पुष्पा मतकर निवृत्त बालवाडी निरिक्षिका उपस्थित होत्या. श्रीमती मतकर यांनी आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेऊन आधुनिक सावित्री घरामध्ये व घराबाहेर काय करते व स्वतःच्या सुरक्षिततेबाबत ती जागृत असते का याविषयी आपले मत मांडले. त्याचबरोबर विद्यार्थिनींनी शिक्षण घेऊन सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालवावा असे आवाहन केले. स्त्रीमुक्ती दिनाची संकल्पना मांडून त्यांनी बालिका दिनानिमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना चॉकलेट वाटले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती पालवे यांनी शिक्षणाचे द्वार उघडे करणाऱ्या सावित्रीबाईं विषयी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी त्यांचे कार्य अविरत पुढे चालवावे व समाज सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा राजवळ तर प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती व विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा. कविता काखंडकी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.डि.डि.हिरे यांनी केले.याप्रसंगी लायन्स क्लबच्या सदस्या डॉ. अर्चना राठी यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.विठ्ठल फड, प्राध्यापक वृंद,कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील महिला कक्ष विभागाकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]