मेष :- कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील.
वृषभ :- आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल.
मिथुन :- एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क :- मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका.
सिंह :- आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात. हित शत्रूपासून सावध रहावे.
कन्या :- चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. जुगारातून लाभ संभवतो.
तूळ :- घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल.
वृश्चिक :- स्वभावात सौम्यता ठेवावी. आपले मत स्पष्टपणे मांडाल.
धनू :- मनातील कडवटपणा दूर करता येईल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.
मकर :- आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल.
कुंभ :- राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा.
मीन :- नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे जलद गतीने पूर्ण होतील.




