loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ५ जानेवारी २०२२!

Jan 5, 2022


मेष :- उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

वृषभ :- इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.

मिथुन :- कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणल्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका.

कर्क :- संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करा.

सिंह :- नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या :- पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल.

तूळ :- घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल.

वृश्चिक :- पराक्रमात वाढ होईल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.

धनू :- घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. चांगला आर्थिक लाभ संभवतो.

मकर :- नवीन विचारांना चालना द्यावी. भविष्याची चिंता करत बसू नका.

कुंभ :- अचानक खर्च सामोरे येतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मीन :- कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल.


अजून बातम्या वाचा..

.