नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. दिंडोरी लोकसभेच्या खासदार तथा केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खा.हेमंत गोडसे हे दुसऱ्यांदा कोरोना बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही खासदार नाशिक मध्ये कार्यक्रमांना सोबत उपस्थित होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्हि आल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मनमाड मधील महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या कामाचा शुभारंभ
वर्षानुवर्षांपासून मनमाड शहरातील प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब...









