Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस आज पासुन प्रारंभ….
प्रथम पुष्प : श्री विवेक घळसासी

Jan 10, 2022

मनमाड : संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक प्रमुख असणाऱ्या विवेकानंद व्याख्यानमालेला आज पासुन प्रारंभ होत आहे.

दरवर्षी 10 ,11 आणि 12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्यातांना आमंत्रित करून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सीतालक्ष्मी हॉल , छत्रे हायस्कुल येथे व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असते , यंदाच्या वर्षी देखील महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची पर्वणी ही शहरातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. आज 10 जानेवारी रोजी व्याख्यान मालेचे उद्घाटन होणार असुन प्रसिद्ध वक्ते श्री विवेक घळसासी , नागपुर (विषय -लस घेऊया सकारात्मकतेची) , यांचे सायंकाळी 5.30 ते 8.30 पर्यंत , सीतालक्ष्मी हॉल , छत्रे हायस्कुल येथे व्याख्यान होणार आहे.

यंदाच्या वर्षी देखील व्याख्यान मालेवर कोरोना परिस्थितीचे संकट असुन त्या नुसार शासनाने ठरवुन दिलेल्या नियमावली प्रमाणे व्याखान मालेची समितीच्या वतीने तयारी करण्यात आली असुन सामाजिक अंतराचे भान ठेऊन आणि संपूर्ण लसीकरण झालेल्या श्रोत्यांना व्याख्यान मालेला मर्यादीत संख्येनेच प्रत्यक्ष स्वरूपात हॉल मध्ये बसवण्यात येणार आहे. मास्क , सॅनिटायझरची व्यवस्था हॉलच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.विवेकानंद व्याख्यानमाला ही अत्यंत लोकप्रिय असल्याने मोठ्या प्रमाणात श्रोतावर्ग हा व्याख्यानमालेतील वक्त्यांना ऐकण्यासाठी येत असतो , अशा तमाम श्रोत्यांसाठी समितीतर्फे यंदाच्या वर्षीच्या तीनही वक्त्यांच्या व्याखानाचे आज पासून युट्युब आणि फेसबुक या सोशल मीडिया साईटवर लाईव्ह प्रक्षेपण सायंकाळी 5.30 पासुन करण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]