उत्तर महाराष्ट्र तील रेल्वे प्रवाशां च्या मागणी नुसार आणि भाजपा नेत्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सक्षम आणि अभ्यासु लोकप्रतिनिधी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारती ताई पवार यांचे अथक प्रयत्न नी भारतीय रेल्वे प्रशासन तर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ मुंबई रेल्वे मार्गावर सोमवार दिनांक 10 /01/2022 रोजी भुसावळ -इगतपुरी ही नवीन मेमु रेल्वे प्रवासी गाडी चा शुभारंभ झाला मनमाड शहर भाजपा भाजपा च्या वतीने भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष आणि दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य नितीन पांडे आणि मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे नेतृत्व मध्ये या नवीन मेमु रेल्वे प्रवासी गाडी चे मनमाड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले कोरोना संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून झालेल्या या स्वागत कार्यक्रम मध्ये सर्व प्रथम भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी या मेमु गाडी च्या सर्व चालकांचे पुष्पहार घालून सहर्ष स्वागत केले त्यानंतर भाजपा महिला मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वाती ताई मुळे व भाजपा मनमाड शहरमहिला मोर्चा शहराध्यक्ष सौ सोनीताई पवार ,नाजमा जलील अन्सारी या महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व चालकांना भारतीय पद्धतीने औक्षण केले तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांचे हस्ते नारळ वाढवण्यात आला भाजपा शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी यांनी कार्यक्रम चे सूत्र संचालन केले या प्रसंगी नरेंद्र मोदी तुमआगे बढो डॉ भारती ताई पवार तुम आगे बढो अश्या घोषणा नी परीसर दुमदुमून गेला या प्रसंगी भाजपा वतीने उपस्थिताना मिठाईचे वाटत करण्यात आले कोरोना च्या 20 महिन्याच्या संकट काळात कडक नियमावली मूळे पॅसेंजर गाड्या बंद होत्या पण केंद्रीय मंत्री आदरणीय डॉ भारती ताई पवार यांच्या पुढाकाराने प्रयत्न नि ही सुरु झालेली मेमु पॅसेंजर रेल्वे प्रवासी गाडी ग्रामीण भागातील सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी ठरणार आहे असे या प्रसंगी नितीन पांडे यांनी सांगितले या स्वागत कार्यक्रमला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी ,भाजप आर्थिक सेल अध्यक्ष कांतीलाल लुणावत सफाई मजदूर संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभैय्या पवार जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन, भाजपा सरचिटणीस एकनाथ बोडखे,भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे,बुधन बाबा शेख,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जैन प्रकोष्ठ अध्यक्ष आनंद बोथरा, भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा ,भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष गोविंद सानप शहर चिटणीस मकरंद कुलकर्णी ,आशिष चावरीया,धीरज भाबड, सुमेर मिसर ,भाजपा दिव्यांग आघाडी शहराध्यक्ष दीपक पगारे, अकिल शेख,अविनाश भाबड,आकाश बिदगर संजय आहेर या प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांन सह मनमाड रेल्वे स्थानकाचे अधिक्षक श्री यादव साहेब, मुख्य वाणिज्य निरीक्षक श्री मीणा साहेब, रेल्वे सुरक्षा बला चे पोलिस निरीक्षक श्री शैलेंद्रसिंग ठाकूर साहेब मुख्य पार्सल निरीक्षक विवेक भालेराव साहेब आदी प्रमुख रेल्वे प्रशासन अधिकारी उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी व नितीन परदेशी यांनी केले तर रेल्वे सुरक्षा बला तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनीची वनरक्षक पदी नियुक्ती
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य( स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड...