लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीचे ज्येष्ठ सदस्य माजी अध्यक्ष माजी झोन चेअरमन एम जे एफ ला. डॉ. प्रताप गुजराती यांची मनमाड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. ला. डॉ. प्रताप गुजराथी यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.डॉ गुजराथी यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत…सास्तूर किल्लारी भूकंप, भूज कच्छ येथील भूकंप त्याठिकाणी जाऊन ५…६ दिवस तेथे राहून सेवाकार्य केले,सतत ३३ वर्षांपासून राज्याच्या विविध आदिवासी आणि ग्रामीण भागात त्यानी वैद्यकीय शिबीरे घेऊन लाखो रूपयांची औषधे मोफत वाटली आहेत.मनमाड शहरात लायन्स चिल्ड्रेन हेल्थ पार्क ,व्हिजन सेंटर ,कर्ही हे स्मार्ट व्हिलेज ,सिंहस्थ काळात सलग १८ दिवस नासिक येथे राहून ८४०० भाविकांची मोफत तपासनी आणि साडेसहा लाखांची मोफत औषधे वाटप,नदी स्वच्छता अभियान इ.प्रकल्प राबविले आहेत.ते महाराष्ट्र साहित्य परिषद,नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड(NAB), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन इ.विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत.
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक
छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...








