Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संक्रांतीनिमित्त वाणांच्या वस्तूंची दुकाने सजली !

Jan 11, 2022

मकरसंक्रांतीत तिळगूळ, हळदी – कुंकवाच्या वस्तूंसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील अत्तर गल्ली बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढली आहे. यंदा वाणाच्या साहित्यात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने यंदा हळदी-कुंकू कार्यक्रमावर संक्रांत येणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू आहे. तीळगूळ, हळदी – कुंकवाच्या वस्तूंसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील एकात्मता चौक, अत्तार गल्ली  य बाजारपेठेत महिलांची गर्दी होत आहे. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, असा संदेश देत एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे. तर सुवासिनींना हळद कुंकू वाणाचे साहित्य देत शुभेच्छा दिल्या जातात मकरसंक्रांतीनिमित्त बाजारात सोबतच विविध प्रकारचे वाण, तीळगूळ, बांगड्या आदी साहित्य उपलब्ध आहे. यंदा वाण वस्तूंच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने महिलांनी प्लास्टिकच्या वस्तूंना पसंती दिल्याचे दिसते. वाणासाठी प्लास्टिकमध्ये १०० रुपयांपासून ते ५०० रुपये डझनपर्यंत वस्तू उपलब्ध आहेत तर स्टीलवस्तू २०० ते १००० रुपये डझनाने ते विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दुकानदारांनी सांगितले. संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. हळद कुंकू, आरसा, पावडर डबे, मेहंदी कोण, नेल पॉलिश, कंगवे, ब्लाउज पीस तसेच ज्वेलरी बॉक्स, छोट्या पर्स, मोबाईल कव्हर, स्टिल भांड्यांमध्ये ताट, वाट्या, चमचे, बाउल, अगरबत्ती स्टँड आदी वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय अनेक ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या वस्तूंचा प्रामुख्याने डसबीनचे वाण देण्यात येतात. दैनंदिन उपयोगी वस्तू प्लास्टिक, स्टीलच्या वस्तू दिल्यास, प्रत्येकीच्या वापरात येईलच असे नाही. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात दैनंदिन उपयोगी वस्तू भेट देण्याकडे कल वाढला आहे. यात साखर, पोहे, गूळ, जिरे, मोहरी, एव्हरेस्टचे मसाले, बिस्कीटे, मॅगीबरोबरच डेटॉल साबण, नारळ आदी वस्तू वाण म्हणून दिल्या जात आहेत. सध्या कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने यंदा हळदी-कुंकू कार्यक्रमावर संक्रांत येणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

अजून बातम्या वाचा..

हेराक्लिओन ग्रीस येथील जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तृप्ती पाराशर हिची निवड

हेराक्लिओन ग्रीस येथील जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तृप्ती पाराशर हिची निवड

हेराक्लिओन ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर मुलींच्या...

read more
आ. मिटकरी यांनी माफी न मागितल्यास जिल्ह्यात फिरकू देणार नाही : ब्राम्हण समाजाचा इशारा

आ. मिटकरी यांनी माफी न मागितल्यास जिल्ह्यात फिरकू देणार नाही : ब्राम्हण समाजाचा इशारा

आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची टिंगल करत खिल्ली उडविल्याचा निषेधार्थ येथील संतप्त...

read more
रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल-पेट्रोलची चोरी उघड;  कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक

रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल-पेट्रोलची चोरी उघड; कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक

मनमाड : येथून जवळ असलेल्या पानेवाडी इंधन कंपनीच्या भागात रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल -...

read more
राष्ट्रसंत सुधारकांच्या जैव-विचार नात्यांची वीण गुंफत रंगला आंबेडकरी शाहिरी जलसा

राष्ट्रसंत सुधारकांच्या जैव-विचार नात्यांची वीण गुंफत रंगला आंबेडकरी शाहिरी जलसा

विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने भीमनगर चिचोंडी बु...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]