Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एस टी कामगार संपावर ठाम : संप मिटण्याची शक्यता धूसर !

Jan 11, 2022

मनमाड बस आगारात गेल्या ६५ दिवसापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही मिटण्याची शक्यता नाही आम्ही संपावर ठाम असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे प्रवाशांचा एसटी प्रवास आणखीन लांबण्याची चिन्हे आहे शासनाने हाक देऊनही माघारी फिरणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही आगारातील एकही कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने आगारातून एकही एसटी धावली नाही. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी आत्ता पर्यंत एसटी  कर्मचाऱ्यांवर ती केलेली कारवाई मागे घेण्यात येईल सर्व कामगारांनी कामावर हजर राहण्याचे आवाहन  केल्यानंतरही मनमाड आगारातील एकही कर्मचारी कामावर गेला नाही त्यामुळे आगारातून एकही एसटी धावली नाही. जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्यात येईल अशी माहिती संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मनमाड आगारात कार्यरत असलेल्या २३६  कामगारांपैकी आतापर्यंत ३० कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आज ९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तर १९७ कर्मचारी अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे गेल्या दिवसांपासुन मनमाड बस आगारातून एकही एसटी बस बाहेर शकली नाही. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय अजूनही कायम आहे. राज्य परिवहन महामंडळाचे विलिनीकरण करून एसटी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा या मागणीसाठी गेल्या ६५ दिवसापासुनी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसह दररोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

अजून बातम्या वाचा..

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड :- मराठा आरक्षणासाठी  राज्य शासनाने  काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या...

read more
श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]