Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राजमाता जिजाऊ ह्या चालते – बोलते विद्यापीठ : प्रा. डॉ. स्मिता देशमुख

Jan 12, 2022

संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आजचे दुसरे पुष्प नामवंत वक्त्या अभिनेत्री प्रा.डॉ. स्मिता देशमुख यांनी गुंफले.कार्यक्रमास आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक प्रा.श्री नितिन लालसरे , प्रमुख पाहुणे डॉ.सौ. वर्षा झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व मान्यवरांचा संस्कृती संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री प्रविण व्यवहारे आणि संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री योगेश म्हस्के यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

आजच्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ स्मिता देशमुख यांनी ‘राजमाता जिजाऊ माँ साहेब’ या विषयावर आपले विचार मांडले , राजमाता जिजाऊ या चालते-बोलते विद्यापीठ होत्या , त्यांनी आपल्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊ यांनी आपल्या रयतेवर होणाऱ्या अन्यान-अत्याचार पाहुन स्वराज्याच्या निर्मितीचा संकल्प केला होता आणि त्यांनी तो छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या प्रकारे घडवुन तो त्यांच्या माध्यमातून पुर्ण देखील केला.आपले विचार मंडतांना प्रा. देशमुख यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगुन उपस्थित श्रोत्यांपुढे आपले विचार मांडले.सर्व शासकीय नियमांचे पालन करून , प्रत्यक्ष उपस्थित मर्यादीत संख्येने आणि ऑनलाईन स्वरूपातील श्रोत्यांच्या उपस्थितीत आजचे व्याख्यान संपन्न झाले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रत्नाकर घोंगडे , परिचय श्री अमोल तावडे आणि आभार श्री आनंद काकडे यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]