loader image
[ays_poll id=7]

कोरोना-ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्याची अध्यापकभारतीची मागणी

Jan 14, 2022

कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन कामकाजाच्या धर्तीवर शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्यात यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक नुकसान टाळावे अशी मागणी आध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी महाराष्ट्र शासन तथा मुख्यमंत्री,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री,शालेय शिक्षणमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात केले आहे.
कोरोना नंतर ओमीक्रोन संसर्गाच्या करणास्थाव सरसकट शाळा महाविद्यालय ऑनलाईन शिक्षणाच्या भरवशावर बंद करण्यात आली आणि इतर सर्व आस्थापना सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन कामकाज त्याच प्रमाणे
सार्वत्रिक निवडणुका चालू आणि शिक्षण शाळा महाविद्यालय ३०-३५ पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद परंतु मंदिर चालू ज्ञान मंदिर बंद मधूशला चालू शाळा बंद चित्रपटगृह,व्यापार,व्यवसाय चालू व शाळा बंद असे निर्णय आपण घेतले आहेत यातून उद्याच्या भारताचे चित्र काय असेल ? याचा विचार करावा,विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपक्रम, प्रकल्प अथवा हस्त पुस्तिका स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात तसेच ऑनलाईन शिक्षणाला पर्याय द्यावा अशी मागणी सरकारकडे शेजवळ यांनी केली आहे.
जागतिक स्थरावर कोरोना अथवा ओमीक्रोन संसर्गाचा मृत्यूदर कमी आहे अशी आकडेवारी सातत्याने मांडली जात आहे.
ह्या संसर्गाबद्दल लोकजागृती व सरकारी नियमांचे पालन हि शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय अस्थपना पालक शिक्षक व विद्यार्थी यांची जबाबदारी आहे त्यांनी ती स्वीकारली आहे परंतु गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या निमित्ताने सरसकट शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांनचे जे शैक्षणिक,मानसिक नुकसान होत आहे हे कसे भरून निघणार पुढे अध्यापन न करता परीक्षा न घेता मुलांना कसे घडवले जाणार आपण कोणती समाज व्यस्था कसे राष्ट्र निर्माण करणार ? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
सरसकट शाळा महाविद्यालय बंद करून राज्य व राष्ट्र शैक्षणिक अपंग केले जात आहे.याचा विचार करून कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन कामकाजाच्या धर्तीवर शाळा-महाविद्यालय नियमित सुरू करावे असे विनंती आवाहन निवेदनाद्वारे ऍड.अरुण दोंदे,एस.एन.वाघ,प्रा.के.एस.केवट,वनिता सरोदे,विनोद पानसरे,नुमान शेख,दीपक शिंदे,सुभाष वाघेरे,अमीन शेख,,ज्ञानेश्वर कोकाटे,राजरत्न वाहुळ,अक्षय गरुड आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.