Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पत्रकार गुणगौरव व कार्यशाळेचे मनमाड येथे आयोजन !

Jan 14, 2022

नांदगाव तालुका व मनमाड   शहर मराठी पत्रकार संघातर्फे  पत्रकार दिना निमित्त  उद्या शनिवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता येथील पल्लवी मंगल कार्यालयात पत्रकार गुणगौरव सोहळा तसेच बदलत्या काळात पत्रकारितेचा दर्जा जपण्याचा एक प्रयत्न म्हणून पत्रकारांसाठी कार्यशाळा तसेच दैनिक जनश्रध्दा तर्फे  जाहीर झालेल्या उत्कृष्ट पत्रकारांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे.
राज्याचे कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या हस्ते तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम  होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून दै.सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ.राहुल रनाळकर, दिव्य मराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, पुण्यनगरीचे संपादक किरण लोखंडे, लोकमतचे मिलिंद कुलकर्णी, पुढारीचे प्रताप जाधव, आपल महानगरचे हेमंत भोसले, लोकसत्ताचे आविनाश पाटील, दिव्य मराठीचे उपसंपादक अभिजित कुलकर्णी, सामनाचे बाबासाहेब गायकवाड, गावकरीचे भागवत उदावंत, देशदूतच्या डॉ.वैशाली बालाजीवाले,  इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे ज्येष्ठ पत्रकार तुळशीराम  भोईटे, नाशिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगीरे, ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास चंद्रात्रे, मार्गदर्शक भास्कर कदम , मोतीराम  पिंगळे आदी उपस्थित राहाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख दैनिकांचे संपादक या कार्यक्रमाच्या निमित्ताने  प्रथमच ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी एकाच व्यासपीठावर येत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम  होईल, अशी माहिती नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका समन्वयक, निमंत्रक अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, सुरेश शेळके तसेच मनमाड  व नांदगाव तालुक्यातील पत्रकार संघाच्या सदस्यांनी दिली. 

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]