तालुका विधी सेवा समिती, मनमाड व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय, मुंबई यांचे ॲक्शन प्लॅन २०२१ – २०२२ अन्वये मधस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी मनमाड न्यायालयात करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य न्यायाधिश श्रीमती. श.आ. लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. सदर कार्यक्रमास मनमाड न्यायालयातील न्यायिक अधिकारी तसेच मनमाड बार संघाचे अध्यक्ष सुधाकर मारे, एड चोरडिया,एड निकम,एड पूजा मल्हारे,एड पालवे, एड अग्रवाल,एड ममता गुप्ता यांसह मनमाड न्यायालयातील पक्षकार, मनमाड वकील संघाचे पदाधिकारी, कर्मचारी तथा नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन एड.चोरडिया यांनी तर मध्यस्थी बाबत माहिती एड. मोरे आणि एड.अग्रवाल यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे समारोप मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती.लोमटे यांच्या ADR Methods & it’s benefits ya विषयावर मार्गदर्शनपर भाषणाने झाला. सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी मनमाड न्यायालयातील न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी, वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर
पावसाळ्यातील यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच मान्सूनने ओढ दिल्याने राज्यातील काही भागांसह नांदगाव...










