Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा – गणेश धात्रक यांचे गिरीश महाजनांकडे मागणी

Sep 22, 2026

नांदगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नांदगाव विधानसभा प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाडचे सभापती तथा मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांची भेट घेतली.

यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी व जनतेच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करून नांदगाव विधानसभा मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असा आग्रह धात्रक यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे धरला.

दरम्यान, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियान अंतर्गत भाजपा नांदगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या अनुषंगाने दुष्काळ, चारा छावनी, पाणी पुरवठा, दुष्काळाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना आदि विषयांबाबत चर्चा देखील ना. महाजन यांचेसोबत करण्यात आली.

या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांनाही सादर करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]