Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री शाकंभरी पौर्णिमा उत्सव संपन्न….

Jan 17, 2022

शाकंभरीदेवीचे नवरात्र प्रत्येक वर्षी पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा असे साजरे करतात,शाकंभरीदेवीची पौराणीक कथा आहे,फार पूर्वींच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपःचर्या करुन ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होमहवन आदि सर्व बंद पडले. त्यामुळे पाऊसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य, फळे आदिसर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हां ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तीची स्तोत्र, स्तुती, जपजाप्य ह्यांची उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तीने सर्वांसाठी शाक (भाज्या) फळे निर्माण केली ,तीच्या कृपेने परत पाउस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली.भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले.शाकंभरी ही अठरापगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित)येथे श्री शाकंबरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.श्री शाकंभरी नवरात्र निमित्त सुरु असलेल्या श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ सेवेकरी भगिनी वर्गाकडून सुरु होते. या वेळी श्री शाकंभरी देवीला आवडणाऱ्या 64 हुन अधिक भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला तसेच देवीच्या फोटोस भाज्या तसेच फळांची आरास करण्यात आली होती.श्री स्वामी समर्थ केंद्रातील सकाळी 10.30 च्या आरतीनंतर दाखवलेल्या 64 भाज्यांच्या नैवद्याचा उपस्थिती सेवेकर्यांना प्रसाद देण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]