loader image
[ays_poll id=7]

एन.आर.एम.यु. नाशिक रोड शाखेतर्फे सैनिक दिवस साजरा !

Jan 17, 2022

आज दि.१७ जाने 2022 रोजी नॅशनल रेल्वे मजदूर यूनियन कर्षण मशीन कारखाना नाशिकरोड शाखेने शाखा कार्यालय मध्ये सेना दिवस(15 जानेवारी सैनिक दिवस) साजरा केला.

कर्षण मशीन कारखान्यात सेवारत काॅ.प्रकाश गिते,काॅ.रमेश ओझा साहेब,काॅ.बाळकृष्ण पळशीकर,काॅ.विजय जाधव,काॅ.अब्दुल रहिम,काॅ.विजेंद्र शर्मा,काॅ.देविदास पवार काॅ.गुलाब झगडे (भारतीय सेनेमधुन सेवा निवृत्त)कामगारांनी भाग घेतला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषाच्या प्रतिमांना,निवृत्त कामगारांनच्या हस्ते पुष्प हार अर्पण केले गेले. त्यानंतर यूनियन प्रतिनिधिकडून पुष्पहार घालुन निवृत्त कामगारांचा सत्कार केला गेला.

युनियन चे सचिव काॅ.व्हि.के चौधरी यानी प्रमुख भाषण केले.भारतीय सेनेचे देशाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका व निवृत्त कामगारांनी देश सेवेतले योगदानाचे महत्व सांगीतले. त्यानंतर ६ निवृत्त कामगारांनी आपले भारतीय सेनेतील कामाचे अनुभव सांगितले.

शेवटी शाखा अध्यक्ष काॅ.अनिल दराडे यांनी आभार प्रदर्शन केले.
सूत्र संचालन काॅ.संदीप कांगणे डेलीगेट यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थित सर्व कामगारांनी अल्पोहारचा लाभ घेतला.कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगित होऊन सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काॅ.मनोज नागरे,काॅ.राजु वाघ,काॅ.सुभाष सोनवणे,काॅ.रियाज सैय्यद,काॅ.सुरेंद्र निळे,काॅ.गजानन शेळके,काॅ.किशोर भामरे काॅ.दिपाली बोरसे,काॅ.अनिता सानप.यांनी योगदान दिले.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.