Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात भूगोल दिन संपन्न

Jan 17, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. ए.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागांतर्गत भूगोल दिनानिमित्त लोणार सरोवर: विज्ञानातील एक रहस्य या विषयावरती ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. या ऑनलाईन व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सी. टी. बोरा महाविद्यालय येथील प्रा.डॉ.अतुल जेठे यांनी पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच लोणार सरोवराची निर्मिती, त्याचे गुण वैशिष्ट्ये, वैज्ञानिक रहस्य याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून निमगाव महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ.एस.एन.निकम व एम.एस.जी. महाविद्यालय येथील उप-प्राचार्य प्रा.डॉ.सी.एम. निकम उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद आंबेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस.आर.पगार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.डी.व्ही.सोनवणे यांनी करून दिली. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.गणेश गांगुर्डे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भूगोल विभागातील प्रा.प्रकाश बर्डे यांचे सहकार्य लाभले व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

अल्पवयीन मुलींचे लग्न – सासु, सासरे,पती, आई ,वडील आरोपी च्या पिंजऱ्यात – नांदगाव तालुक्यातील घटना

नांदगाव : मारुती जगधने लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले...

read more
नांदगाव नॅशनल हायवेवरील अनधिकृत गतीरोधकामुळे होताहेत अनेक प्रवासी जखमी – गतिरोधक काढण्याची मागणी

नांदगाव नॅशनल हायवेवरील अनधिकृत गतीरोधकामुळे होताहेत अनेक प्रवासी जखमी – गतिरोधक काढण्याची मागणी

नांदगाव : (मारुती जगधने) शासन डिझेल पेट्रोल बचतीचे मार्ग शोधत आहे त्यातच नॅशनल हायवे किंवा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]