Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शोकाकुल वातावरणात बोलठाण येथील जवान अमोल पाटील यांचेवर अंत्यसंस्कार

Jan 18, 2022

बिहार मधील विरपुर सीमेवर कार्यरत असताना तालुक्यातील बोलठाण येथील जवान अमोल पाटील यांचा उच्च दाबाच्या वीजेचा धक्का लागून वीरमरण प्राप्त झाले होते.त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथे हवाई दलाच्या विमानाने आणून त्यांच्या मूळगावी बोलठाण येथे आणण्यात आले होते. काल शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शाहिद जवान अमोल यांच्या लहान भावाने पाटील यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.महाराष्ट्र पोलीस दलातर्फे त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.यावेळेस परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.तालुक्याचे आमदार सुहास कांदे,वैजपुरचे आमदार रमेश बोरणारे, मा आ.अनिल आहेर, संजय पवार, प्रांताधिकारी सोपान कासार, नायब तहसीलदार मार्कंड, सुभाष कुटे, बबी काका कवडे,आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.आमदार कांदे यांनी वीर जवान अमोलची विरपत्नी आणि वीरकन्या यांचे नावे एक जबाबदार भाऊ म्हणून ५ लाख रुपये एफ डी करण्याचे जाहीर केले तसेच शासकीय सर्व योजना पूर्ततेसाठी कुठेही जाण्याची गरज नाही, त्या योजनांची पूर्तता आपल्या घरी येऊन मी पूर्ण करून देईन व वीर जवान अमोल पाटील यांचे बोलठाण येथे भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले.

 

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]