Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आंतरराष्ट्रीय अबॅकस व वेदिक मॅथ चॅम्पियनशिप स्पर्धेत मनमाड च्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश

Jan 18, 2022

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर मनमाड येथील गुडविल अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धेत दहा देशातील विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुपर जूनियर वन पासून तर सीनियर व वेदिक मॅथ स्तरावरील अनेक प्रकारच्या परीक्षा झाल्या. त्रिशा पवार, स्वरा पांडे, अंतरा कोठावदे, विरेन साबळे, आदित्य सूर्यवंशी, आयुष राय, ईशान राय, स्वामिनी कातकडे, जिज्ञासा मोरे, प्रियदर्शी वानखेडे, अध्ययन चव्हाण, सिद्धेश निकम, समृद्धी जेजुरकर, संजना पांडे, सिद्धार्थ मोकळ, अनुज देव, सईशा माने, सईश्री माने, गार्गी गुरव यांना प्रथम विनर तर सर्वेश कातकडे, लावण्या पाटील, अभिनव चव्हाण, रोहित देवरे, श्रेया बंदावणे, वैष्णव पायमोडे, साईशा गायवले, यक्षित गवांदे, अवनी बुधर प्रथम त्रश पटेल, मोहम्मद ताऊस शेख, अश्विनी सांगुले, योगेश्वरी घटे द्वितीय आणि जानवी आहेर देवेश वाधवानी यांना तृतीय पारितोषिक मिळाले. करोनाच्या या तिसऱ्या लाटेच्या वातावरणातही क्लासेसच्या शिक्षिका सौ. हर्षा मोरे व सौ. वृषाली पांडे यांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन व ऑफलाईन तयारी करून घेतली. त्यांना ICMAS अबॅकस संस्थेकडून बेस्ट टीचर पारितोषिक देण्यात आले. गुडविल शाळेचे संस्थापक ॲड. श्री. शशिकांत काखंडकी व पालकांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]