Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडकरांनो लसीकरणाचा वेग वाढवा – जिल्हाधिकारी मांढरे

Jan 19, 2022

मनमाड शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे ही चिंतेची बाब असली तरी यात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे तसेच मृत्यूदर नसल्याने ही जमेची बाब असली तरी रुग्णवाढ होऊ शकते त्यामुळे दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हेच सुरक्षा कवच असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनमाड येथील शासकिय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले.

मनमाड येथील शासकिय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे  बोलत होते यावेळी येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, मनमाड नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्याशी कोरोना परिस्थितीच्या संदर्भात आढावा घेऊन चर्चा केली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नांदगाव तालुक्यासह मनमाड शहरामध्ये लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. हे योग्य नाही. याबद्दल श्री. मांढरे यांनी चिंता केली. नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक सूचना आणि नियमांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, लसीकरणाला जगभर मान्यता मिळाली आहे. लसीकरण हे सुरक्षित जीवनाची खात्री आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोरोना झाल्यास तो चार-पाच दिवसांत पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे सुरक्षा कवच आहे असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले.
मागील अनुभव लक्षात घेऊन मनमाड व नांदगावला दोन ऑक्सिजन प्लांट तयार आहेत. या दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन साठा आणि साठवणूक क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कोणती कमतरता भासणार नाही. नांदगाव तालुक्यांत २१७ तर मनमाड शहरांत १३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सध्या आहे ही चिंतेची बाब असली तरी हॉस्पिटलायझेशन नाही, डेथ रेटही नाही. तरीही कोरोना रुग्णांमध्ये आगामी काळात वाढ होऊ शकते त्यामुळे दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच लसीकरण वाढविण्यासंदर्भातही उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्याची माहिती श्री. मांढरे यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात पत्रकारांची भक्कम एकजूट विधायक उपक्रम राबविणार; पत्रकार दिनी निर्धार

नांदगाव तालुक्यात पत्रकार संघाची भक्कम एकजुट तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांपुढील बदलती...

read more

गिरणानगर वासियांचा न.पा. हद्दीत समवेशास हिरवा कंदील – ठराव सर्वानुमते मंजूर !

नांदगाव शहराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर...

read more
शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के

शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के

संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक प्रमुख...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]