Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विनामास्क शहरात वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई !

Jan 19, 2022

वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज पालिका प्रशासन एक्शन मोडवर आलेले दिसले पथके तयार करत शहरातील विविध भागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. अनेकांना देत मास्क घालण्याच्या सूचना देण्यात येत आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.शहर आणि परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगरपालिका ही प्रशासनही सज्ज झाले. विविध पथके तयार करण्यात आली असून  शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ तसेच शहरातील विविध भागात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना सूचना करत दंडात्मक कारवाई सुरू केली. कोरोना बाधीतांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक सूचना आणि नियमांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे आदी सूचना देण्यात आल्या. मनमाड शहरांत १३४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या सध्या आहे ही चिंतेची बाब असली तरी हॉस्पिटलायझेशन नाही , डेथ रेटही नाही. मनमाड शहरात पात्र ४९,२६३ लाभार्थ्यांन पैकी ४१,८८८ नागरिकांनी पहिला डोस घेतला त्याचे प्रमाण ८५.०३ टक्के इतके आहे. तर ७३७५ नागरिक अद्याप लसीकरणाचे बाकी आहे. २०८३३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याचे प्रमाण ४२.२९ टक्के इतके आहे. पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच किशोरवयीन मुला – मुलीचे मनमाड शहरात ९७७ लसीकरण झाले असुन तालुक्यात ७०६० लसीकरण झाले आहे.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]